नितीन शाह, हिंदु महासभा

मी नुकतेच जेष्ठ राजकीय विश्लेषक/पत्रकार भाऊ तोरसकर यांचे काही विडिओ पहिले, लेख वाचले. हे सर्व लहानमुलांचे राजकीय विश्लेषण असल्यासारखे वाटते. मतदार काय विचार करतात याची जाणीव भाऊच्या कामात दिसत नाही.

युती असून देखील २०१४ ते २०१९ दरम्यान सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयात सेनेचे मत जाणून घेतले नाही. निलेश राणे व राम कदम सारख्यांना तिकीट देऊन शिवसेनेला का दुखवले याची चर्चा नाहीं. युती तुटल्याचे खापर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर फोडून भाऊ मोकळे झाले. परंतु पहाटेच्या शपथविघीमुळे माजलेल्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने का आपटले यावर मात्र झाकली मूठ सव्वा लाखाची?

“बंद खोलीत अमित शाह बोलले, देवेंद्र तेथे हजर नव्हते.” ही चर्चा व्यक्तीगत संपत्तीची वाटणी करण्याबाबत होती काय? शरद पवार कारस्थानी नेते आहेत असे सर्व पत्रकार सांगतात, मग तसे असल्यास ‘बडे’ लोक त्यांच्या मागे का जातात? काँग्रेस श्रेष्ठीनी शिवसेने सोबत बसायची तयारी शरद पवार यांच्या सल्ल्याने कशी केली?

मुळात भाऊ सारखे पत्रकार भाजपच्या भक्तांना बालिश समजुनच विश्लेषण करतात . “ह्याला आवडले , ह्याला खुर्चीवर बसायचे होते.” ही पत्रकारिता आहे का? १७० लोक एकत्र आले, शिवसेनेचे निवडून आलेले आमदार त्यांच्या नेत्यांच्या सोबत राहिले । बच्चु कडू सारखे अपक्ष, पण नेहमी कार्यरत आमदार देखील सेने सोबत राहिले. पण त्याचे कारण खुर्चीमघ्ये बसून लेख लिहिणाऱ्या पत्रकाराला कसे कळणार?

By: Nitin Shah


This content cannot be used as evidence against the writer and publisher to file case in any court of law around the world. Images used in the content belong to their respective owners. The aim of this site is to spread awareness without any financial gain. We do not wish to hurt anyone’s sentiments or cause financial loss to any individual or organization.

All rights reserved with- CJ24